भारत माता कि जय!
मराठी विषयात देखील बऱ्याचदा अपठीत गद्य हा प्रश्न येतो. काही कथा नक्की वाचायला हव्यात अश्या असतात. इथे खाली एक महिलेचे मनोगत आहे. नित लक्ष देवून वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
जोडणी
आवरलं सगळं पुढे
काय?
५२ वर्षांचं सहजीवन शेवटी थकत चालले होते हे अन् मीही तरीही ,अजून हातीपायी धड होतो दोघंही वयानुसार थोडसं पथ्यपाणी तेवढं आता चालायचंच खरंच मजा यायची एकमेकांना सांभाळून घेण्यात एकमेकांचे रूसवेफुगवे काढण्यात आयुष्य मुरलेल्या लोणच्यासारखं झालेलं.
खरं सांगू? वाईट नाही वाटलं फार समाधानानं
गेले हे अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा, चेहऱ्यावर तेच हसू आयुष्य हसत हसत
जगले अन् त्यांच्यामुळे मी सुद्धा. वाईट एवढंच की, आमचं
जॉईंट अकाऊंट बंद झालं होणारच जोडीनं जायला तो सिनेमा आहे थोडीच? दोघांपैकी
कुणाला तरी,
आधी
जावंच लागणार. आम्ही खूप वेळा बोललो होतो दोघं यावर शपथच घ्यायला लावली होती यांनी
'जो मागे
राहील,
त्यानं
मजेत जगायचं आयुष्य नदीसारखं राहिलं पाहिजे सदैव वाहतं त्याला ब्रेक नको नाही, बिलकुल
नाही.'
दोन्ही मुलांशी
आमचं व्यवस्थित पटायचं दर रविवारी सगळी इथंच तर असायची पवन मोठ्ठा आफिसर आहे बँकेत,
वरूणचा स्वतःचा ट्रॅव्हलचा बिझनेस, छान चालंलंय दोघांचं, सुनाही छान मिळाल्या आहेत.
खरं तर हेच मागे लागले दोघांच्या पैसा मिळवायला लागल्यावर, सेव्हिंग
हवं म्हणून दोघांना लोन काढायला लावलं छान फ्लॅट झाले दोघांचेही ही जागा तशी लहानच
पडायची. हे नेहमी म्हणायचे 'नवा नवा संसार आहे त्यांचा जगू दे
जरा मर्जीनुसार लांब कुठे? एकाच गावात तर आहोत पण रविवारी
मात्र सगळ्यांनी भेटायचंच.' खरंच एकही रविवार चुकला नाही. आमचेही
उद्योग चालू असायचेच. वेगळे रहात असलो, तरी वेगळे कधीच
नव्हतो.
पवन राहतो
बावधनला. अन् वरूण कर्वेनगरला. दोघांच्या बायका नोकरीवाल्या. मुलं आता कॉलेजात
जाणारी. प्रत्येकाला स्वतःचे उद्योग. माझं काय? एरवी
एकटे राहिले असते पण आता कॉन्फिडन्स वाटत नाही. हे होते म्हणून जाऊ दे. पवन, वरूण
ठरवतील तसं. सध्या तर ती दोघं, अन् दोन्ही सुना, इथेच मुक्कामाला
आहेत. लोक येताहेत भेटायला. सगळ्यांनी रजा टाकल्या आहेत. दोघी सगळं छान सांभाळत
आहेत. मला कशाला हात लावू देत नाहीयेत.
काल सहज ऐकू आलं.
पवन वरूण गॅलरीत बोलत होते. 'माझी जागा लहान पडणार पोरांना
आजकाल सेपरेट रूम लागते.' माझ्याकडेही तोच प्राब्लेम आहे. सहज
कानावर आलं. चालायचंच. प्रत्येकाला संसार आहे. असू देत. माझा माझ्या पोरांवर भरोसा
आहे
कालच चौघं मिळून
कुठं तरी जाऊन आले. बहुधा जागा बघायला. आवडली असावी.
सगळं व्यवस्थित आहे. आईलाही आवडेल. मी गेले अन् सगळे चिडीचूप. बहुधा कुठला तरी ओल्ड शेल्टर होम? तरीही, माझ्या मनात कुणाविषयीही अढी नाही. पुढचे चार दिवस गडबडीचे, मी घरीच, त्या चौघांची धावपळ, म्हणतील तिथं सह्या केल्या.
आज सकाळी म्हणाले, 'चल आई'. बरं बाई वाटलं, या घरातला शेवटचा दिवस डोळे भरून निरोप घेतला. मागे वळून बघितलं नाही.
गाडीतून कुठल्या तरी मोठ्ठ्या सोसायटीत एक बिल्डींग, पाचवा मजला, दोन मोठ्ठे फ्लॅट, दरवाजे वेगवेगळे, दोन्ही दारावर आमचं फक्त आडनाव. आतून एकत्र जोडलेले, सगळ्या फ्लोअरवर आमचीच सत्ता. ‘आई, हे आपलं घर’
'आपलं' शब्द
ऐकला. खूप बरं वाटलं. बाबा गेले अन्, दोघांनी ठरवलं, ‘बास
झालं! आईसाठी एकत्र यायचं.’ दोघांनीही आपापली घरं विकून टाकली. दोन 3 bhk
वाले
हे फ्लॅट बघितले, शेजारी शेजारी! एकत्र जोडून घेतले. एकच मोठ्ठा हॉल, एकच
स्वयंपाकघर ठेवलं, आईसाठी सेपरेट रूम, पोरांच्या वेगळ्या, नातवंडांनाही सेपरेट
रूम्स, दोन्ही सुना म्हणाल्या, ‘काळजी नको! आम्ही सांभाळून घेऊ एकमेकींना.’
आई, आपल्या फ्लॅटमधे आपल्या गावाकडच्या चार मुली राहणार आहेत. बाबांची इच्छा होती. गावच्या मुलींना पुण्यात रहायची सोय नाही. म्हणून पुढचं शिक्षण अडतं. सरपंच साहेबांना खूप आवडली कल्पना! ते सांभाळणार आहेत सगळं दर रविवारी तूही चक्कर टाकायचीस. या दोघी घेवून जातील तुला.’
खूप आवडलं. अगदी
थाटात गृहप्रवेश झाला. काय बाई, माझ्या हातून रिबन सुद्धा कापली. आत
गेले. हॉलमधे यांचा प्रसन्न फोटो आनंदानं हसत होते. मीही मी म्हणलं नाही. माझा
माझ्या पोरांवर पूर्ण विश्वास आहे म्हणून!
'परमेश्वरा,
वाटणी मागणारी नाही, जोडणी करणारी मुलं माझ्यापोटी जन्माला आली. धन्य आहे रे तुझी अशीच
कृपा राहू देत! या गोजीरवाण्या घरात तुम्हीही भेटून या एकदा सगळ्यांना!
अनामिक
खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
१) लेखिका आणि तिच्या पती चे वैवाहिक जीवन कसे होते?
२) जो मागे राहील त्याने काय करायचं आहे?
३) सगळे रविवारी का भेटायचे? विभक्त कुटुंब पद्धतीत असं आठवड्यातून एकदा भेटण का उपयोगी आहे?
४) लीखीकेची दोन्ही मुलं कशी होती?
५) पवन आणि वरून परत एकत्र का राहू लागले? एकत्र कुटुंब पद्धती का आवश्यक आहे?
६) लेखिका शेवटी देवाचे धन्यवाद का देत होती?
सगळ्या प्रश्नांची उत्तरे खाली comment मध्ये द्या. सध्याचा स्थ्तीतीत एकत्र आणि विभक्त कुटुंब पद्धती वर चर्चा होणे आवश्यक आहे. आणि चर्चा करण्यासाठीच comment सेक्शन आहे.
धन्यवाद!
No comments:
Post a Comment